Disha Shakti

क्राईम

नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याकडून मुलाची हत्या !

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : त्रासाला कंटाळून पित्याने मुलाची हत्या केली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव) यांच्या शेती वाटपाच्या कारणावरून होणार्‍या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार (दि 14 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फळीने मारहाण करून हत्या केली. दि.18 मे रोजी मृतदेहाचा सर्वत्व दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्याची उकल उघडकीस आली.

शिवाजी यांची आई अलका दादासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाने हे करीत आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!