अहमदपूर प्रतिनिधी /नंदराज पोले : अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत खरीप हंगाम पुर्व तयारी च्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी चे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी गावचे कृषी सहायक हणमंत टोकले यांनी गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन उगवण क्षमता तपासणी चे महत्व सांगुन गोणपाट पद्धतीने उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले.
या सोबतच बिजप्रक्रियेचे महत्व पटवुन देण्यात आले, योग्य वाणांची निवड, बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवड करणे, शंखी गोगलगाय चे नियंत्रण, महाडीबीटी पोर्टल वर बियाण्या करीता ऑनलाईन अर्ज करणे, फळबाग लागवड योजना, तुर पिकाचे एकात्मिक खत व किड रोग व्यवस्थापन इ. विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी गावातील चंद्रहास हामणे, गोविंद मुसळे, पत्रकार नंदराज पोले, सोमनाथ मुसळे, व्यंकटी पोले, चैतन्य कुलकर्णी, कृष्णा मुसळे, गुरूलिंग हामणे आदीसह गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावचे कृषी सहाय्यक हनमंत टोकले,पोकरा चे समुह सहायक बालाजी आइलवाड यांनी मार्गदर्शन केले._
Leave a reply