विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर भागातील एमआयडीसी परिसरात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तीन आरोपींसह मशिनरी, होंडा सिटी कारसह गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा २२ लाख १५ हजार ७५६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विमल पानमसाला नावाने बनावट गुटखा या ठिकाणी तयार केला जात होता. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहर पोलीस स्टेशनला मात्र याची खबर नव्हती. श्रीरामपूर शहर पोलिसात या प्रकरणी श्रीरामपूर खंडाळा बेलापूर पुणे आणि मुंबई येथील सातजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना ताब्यात घेतले असून कारखाना मालकासह चौघे पसार आहेत.
सुनिल महादेव जगदाळे , पनवेल, नवी मुंबई, मुळ रा. बिदालगाव, ता.माण, जि. सातारा), कार्तिक किशोर जेकवाडे (रा. बेलापूर रोड, वॉर्ड नं ७, श्रीरामपूर), सचिन भैरवनाथ नवले (रा.सुभाषवाडी, बेलापूर, यांना ताब्यात घेतले आहे. गोपी ओझा राहणार. वारजे, माळवाडी पुणे), जीवन पवार (रा. लोढा पलावा, डोंबिवली, जि.ठाणे), प्रफुल्ल बाबासाहेब ढोकचौळे (रा. रांजणखोल खंडाळा, सुभाष घोरपडे (रा. श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, हे पसार आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य हवालदार गणेश भिंगारदे यांनी यांनी फिर्याद दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुप्त माहिती मिळाली की, श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये स्पर्श एंटरप्रायझेस सी ६७ कंपनीसमोर एका कंपनीमध्ये ओझा, पवार हे ढोकचौळे व घोरपडे यांच्या कंपनीमध्ये साथीदारांसह सुपारी, पांढरे रंगाची पावडर, तंबाखू मशिनद्वारे एकत्र करुन बनावट विमल पानमसाला व व्ही वन तंबाखू तयार करुन त्याचे पॅकींग लेबलींग करुन त्यांची काळे रंगाची कार (क्र.एमएच ०२ सीव्ही ०६५३) मध्ये भरुन विक्री करणार आहेत. त्यांनी याठिकाणी कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे, मुख्य हवालदार दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, संतोष लोढे, पोलिस नाईक संदिप चव्हाण, संभाजी कोतकर यांचे पथक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह कारवाईसाठी सदर ठिकाणी सायंकाळी पाच वाजता छापा टाकला. तेथे तीन व्यक्ती राज्यामध्ये बंदी असलेला व शरिरास घातक असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचे उत्पादन व विमल बॅण्ड नावाने बनावट पॅकींग करतांना दिसून आले. कंपनीची पाहणी केली असता तेथे बनावट गुटखा बनवण्याचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी मुख्य हवालदार गणेश भिंगारदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळातच महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे त्यातच बनावट गुटखा पकडल्याने गुटखा खाणाऱ्या शौकिनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बहुतांश तरुण गुटख्याच्या आहारी गेल्याने कॅन्सर सारख्या भयानक आजाराला सामोरे जात आहे यात महिलांचा देखील समावेश आहे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करून सदर कृत्यांचा बीमोड केला पाहिजे हीच अपेक्षा
Leave a reply