Disha Shakti

इतर

श्रीरामपूर येथे दारूबंदी झाली न झाल्यास महिलांचा आमरण उपोषणाचा इशारा

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी /  गणेश राशीनकर : श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर (कोकरे ) येथील महिलांनी दारूविषयी आक्रमक धोरण घेत विशेष ग्रामसभेद्वारे दारूबंदीचा ठराव संमत करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे सह दारू उत्पादन शुल्कचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. महिला तसेच विशेष ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे व्यवसाय असून त्यामुळे अनेक तरुण पिढी बसमधील होत चालले आहे.

दारूमुळे प्रत्येक कुटुंबात वाद विवाद होत असून कुटुंबातील बालकावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे . लहान मुलांना देखील दारूचे आकर्षण झाल्याने तरुण पिढी बेकायदेशीर मार्गाला लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे आपल्या परिसरातील दारू विक्री तत्पर बंद करण्याची मागणी ग्रामसभेद्वारे करण्यात आली. तसेच गावातील दारूबंदी  व अवैद्य व्यवसाय त्वरित बंद न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही महिलांनी या ठराव द्वारे दिला आहे.

सुमारे 80 ते 90 महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच दारू उत्पादन शुल्क विभाग नगर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आलेले आहे.तसेच सदर महिलांनी दुसऱ्या दिवशी गावातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या सर्व दुकानदारांकडे जाऊन दारू बंदच करण्याची मागणी करत कुंटूबामध्ये होत असलेल्या वादासह तरुण पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामाची कल्पना दिली.

याप्रसंगी सरपंच नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमित कोकरे, दीपक खेमनर,बाळू उपळकर यांच्यासह उषाबाई भडांगे, आशाबाई भडांगे, रेखा जाधव, आशाबाई उपळकर, अनिता धनवटे,नंदा भडांगे , ग्रा.पं. सदस्य रंजना माळी, ग्रा.पं.सदस्य रेखा कुसळकर, इंद्राबाई उपळकर, अश्विनी उपळकर, कोमल धनवटे, जया खैरे, विमल धनवटे , सुनीता धनवटे ,जनाबाई धनवटे, स्वाती कोळेकर,मुक्ताबाई उपळकर , विठाबाई पांढरे,सुमन गुंजाळ, रूपाली धनवटे आदीसह सुमारे 80 ते 90 महिला उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!