दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दिनांक 25/6/2024 रोजी सकाळी अकरा वाजता पुणे जिल्हा अधिकारी पुणे जिल्हा कार्यालयात भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाच्या वतीने दिव्यांगांसाठी संजय गांधी निराधार योजनेची अनुदान रक्कम 1500 हजारावरुन 6000 हजार रुपये मिळावे याकरिता जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले. त्याचबरोबर दिव्याच्या अंतोदय योजना पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राबविण्यात यावी व पुणे जिल्ह्यातील सर्व देवांना 35 किलो धान्य मिळावे याकरीता त्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यावेळी बाबासाहेब जगताप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाजपा दिव्यांग आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे भाजपा दिव्यांगा आगाडी संजय तुपे, संतोष जगताप, राजेंद्र मनोहर, अंकुश पांडुरंग, गायकवाड सागर, गायकवाड भगवान, डोंबाळे आप्पा, खोमणे रायबा नानेकर बाबुराव मोरे इत्यादी मंडळी उपस्थित होते.
Leave a reply