विशेष बातमी / रमेश खेमनर : राहुरी : काल दि.२६ जून २०२४ रोजी शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हाॅलमध्ये मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी सुमारे दिड वाजे दरम्यान राहुरी शहरातील एक नामांकित इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार मतदानाची बातमी घेण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण केले व नंतर मतदान सुरु असलेल्या हाॅलमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक असलेल्या अधिकाऱ्यांना मतदानाची शूटिंग घेऊ का? अशी विचारणा केली असता त्यावेळी संबंधित अधिकारी यांनी संबंधित पत्रकाराला धकलून बाहेर व्हा. अन्यथा तुमच्यावर गून्हा दाखल करील अशी धमकी दिल्याने या घडलेल्या घटनेची माहिती राहुरी तालुक्यातील पत्रकारांना समजताच राहुरी तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली व संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांस दिलेल्या वागणुकीचा निषेध नोंदविण्यात आला.
संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्रकारांनाच जर अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय व खेदजनक बाब असून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. व दुसरीकडे अशे उच्चस्त पदावर असलेला अधिकारी पत्रकारांना अशी वागणूक देत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक देत असेल या घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहॆ. या घटनेचा आम्ही राहुरी तालूक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहिर निषेध करतो. असे तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले. राहुरी तालूक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, आर आर जाधव, राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, रमेश खेमनर, बंडू म्हसे, सचिन पवार, नानासाहेब जोशी, आप्पासाहेब मकासरे, अशोक मंडलिक, मनोज साळवे, राजेंद्र पवार, राजेंद्र म्हसे, कृष्णा गायकवाड, सतीष फुलसौंदर, मीनाश पटेकर, शरद पाचारणे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आकाश येवले, देवराज मंन्तोडे आदिसह अनेक पत्रकार उपस्थित होते
शासकीय अधिकाऱ्याकडून पत्रकारास अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तहसीलदार यांना निवेदन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राहुरीतील पत्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0Share
Leave a reply