Disha Shakti

इतर

चिखलठाण जिल्हा परिषद शाळेचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / शेख युनस : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद अंतर्गत विविध गुणदर्शन स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते याच स्पर्धेमधून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये छोटा गट आणि मोठा गट १०० मीटर धावणे यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेचा आयोजन त्रिमूर्ती प्रतिष्ठान नेवासा येथे आयोजित करण्यात आले होते १०० मीटर धावणे यामध्ये मुलांचा मोठा गटात आदिल नवेद शेख याने तृतीय क्रमांक मिळवला आहे तर ५० मीटर धावणे छोटा गट मुली यामध्ये प्रांजल भारत काळनर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामुळे चिखलठाण जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा आपले कार्य सिद्ध केले आहे मुलांच्या कीर्तीमुळे गावामध्ये प्रत्येक ठीक ठिकाणी मुलांच्या अभिनंदनचे बॅनर लावण्यात आले आहे. चिखलठाण ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार आयोजित केला आहे.

 यावेळी भाऊ उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष संतोष काळनर, अल्ताफ शेख यांनी सायंकाळी मुलांचा सन्मान केला त्याचबरोबर सुभाष बाचकर, महादू काळनर, बाळासाहेब बर्डे, दीपक काळनर, विनोद काळनर, इसाक सय्यद, भारत काळनर, संतोष शेलार शरद बागुल आदी ग्रामस्थांनी पुष्प देऊन सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापक रोडे सर,राजाराम काकडे सर, नागटिळक सर, आंबेकर सर, रानपाटील सर, योगेश सारोक्ते सर, ह.भ.प. संतोष गाडेकर महाराज सर आदींचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!