Disha Shakti

सामाजिक

श्री शंकेश्वर महाराज दिंडीचे शिरापूर फाटा भिगवण नगरीमध्ये स्वागत

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी/ सुधीर लोखंडे  : दि .११. श्री शंकेश्वर महाराज पालखी सोहळा भिगवण नगरीमध्ये दाखल झाला , या सोहळ्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ जाधव होते , भिगवन शहरांमध्ये दाखल होतात श्री शंकेश्वर महाराज पादुकांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व आलेल्या वारकऱ्यांचा येथो चित्त सन्मान करून स्वामी चिंचोली (होले वस्ती) येथे महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी शरद भाऊ जाधव प्रहार जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार खानवटे गावचे अध्यक्ष कोरेश्वर काका व खानवटे गावचे कार्याध्यक्ष सुधीर लोखंडे यांनी जिल्हाध्यक्ष शरद भाऊ जाधव यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, श्री शंकेश्वर महाराज यांची दिंडी दरवर्षीप्रमाणे पंढरपूर कडे भिगवण शहरांमधून जाते , यावेळी प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये मदनवाडी गावचे अध्यक्ष मारुती सुळ व भिगवन शहराध्यक्ष महेंद्र निंबाळकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पांडुरंगाला साखडे घालण्यात आली व दिव्यांगाच्या व्यथा लवकर दूर कर असे मागणे मागण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!