राहता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : ०१ ऑगस्ट २०२४ रोजी राहता तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते. यांचा जन्म ०१ ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.
अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी पोवाडे, गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जणते पर्यंत पोहोचवले. त्यांना लोकशाहीर पदवी दिली. त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. यावेळी उपस्थित नांदूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्व मित्रमंडळ, शेतकरी संघटना, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Leave a reply