इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : श्री. सुधीर शशिकला प्रभाकर लोखंडे . पेपर ला बातमी देणाऱ्या पेक्षा दुकानात, घरोघरी जाऊन आपली बातमी लोकांपर्यंत पोहोच करणार पेपर विक्रेता म्हणजे विनायक भाऊ शेलार हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्ही बहुतांश वेळा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांची किंवा एखाद्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची बातमी एकली किंवा वाचली असेल पण कधी एखाद्या पेपर विक्रेत्याची सेवानिवृत्तीची बातमी ऐकली नसेल ना गेले 50 वर्ष होऊन ऊन, वारा, पाऊस याची कसलेही तमान बाळगता अखंड सेवा देणाऱ्या एका अवलियाने शरीर साथ देत नाही म्हणून आत्ता थांबण्याचा निर्णय घेतला म्हणजे काय तर थोडक्यात सेवानिवृत्ती घेतली.
भिगवण मध्ये गेली ५० वर्ष अविरतपणे पेपर वाचताना दुकानात घरोघरी अगदी रस्त्यावर भेटेल तिथे पेपर पोहोचविण्याचे काम विनायक भाऊ शेलार यांनी अगदी तंतोतंत पूर्ण केले विनायक भाऊ यांचे खूबी म्हणजे कुठल्याही ठराविक ग्राहकाला कुठला पेपर पाहिजे हे त्यांना अचूक लक्षात येते त्यांचा पेपर संध्याकाळीचे आठ साडेआठ वाजले तरी लोक वाचायला घेतात.
विनायक भाऊ शेलार यांचा पेहराव पांढऱ्या रंगाचा पायजमा, पांढऱ्या रंगाचा शर्ट,किरकोळ शरीरयष्टी डोक्यावर पांढरे केस ,पांढरी टोपी असा त्यांचा साधा पोशाख असायचा विनायक भाऊ शेलार हे भिगवण च्या मुख्य बाजारपेठेतून पेपर वाटताना दिसणारे व्यक्तिमत्व. पूर्वी वाहतुकीच्या यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे पेपर हे रेल्वेने भिगवण स्टेशनला यायचे विनायक भाऊ हे भल्या पहाटे भिगवण स्टेशनला सायकलवर जाऊन पेपरचे गट्टे सायकलवर घेऊन भिगवण व आसपासच्या पंचक्रोशीत पेपर वाटायचे मात्र रोजच्या कामामुळे व धकाधकीच्या जीवनामुळे शरीर व मन थकून गेले पहिल्यासारखा उत्साह ही राहिला नसल्यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीचा निश्चय केला.
त्यावेळी त्यांचा सन्मान भिगवण शहर नाभिक संघटना मा.अध्यक्ष , व्यसनमुक्ती दिव्य समाज निर्माण संस्था सदस्य, प्रहार दिव्यांग संघटना तालुका कार्याध्यक्ष तथा पत्रकार श्री सुधीर शशिकला प्रभाकर लोखंडे यांच्यावतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार सुधीर लोखंडे यांच्याकडून ५० वर्षाची अखंडित सेवा देणाऱ्या सेवानिवृत्त पेपर विक्रेत्याचा सन्मान

0Share
Leave a reply