Disha Shakti

इतर

सीएनजी पायीपलाईन कामाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – प्रशांत लोखंडे

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिस स्टेशन येथे शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. व प्रशांत लोखंडे, प्रशांत मुसमाडे पा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पो.नि.संजय ठेंगे यांची नगर-कोपरगाव महामार्गावर चालू असलेल्या सीएनजी पायीपलाईन कामाच्या उपाययोजना न केल्यामुळे घडणारे अपघातास जबाबदार धरत सबंधित काम घेणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे युवा नेते प्रशांत लोखंडे,प्रशांत मुसमाडे,प्रशांत खळेकर, लतिका गोपाळे,महेंद्र उगले,सतीश घुले,रोहित नालकर, अनिल आढाव, सोमनाथ धुमाळ,विनायक बाठे,गणेश सिनारे,महेंद्र शेळके, सोमनाथ शिंदे उपस्थित होते. शिवसेना राहुरी ता.प्र.देवेंद्र लांबे यांनी म्हंटले आहे कि, गेल्या अनेक दिवसांपासून नगर-कोपरगाव महामार्गाच्या कडेने सीएनजी पायीपलाईन टाकण्याचे काम संथ गतीने चालू आहे.नगर- कोपरगाव महामार्गाच्या कडेने सीएनजी पायीपलाईन साठी खोद काम करत असतांना वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता काम चालू आहे.

महामार्गाच्या कडेला खोदकाम करतांना ८ ते १० फुटाचा खड्डा केला जातो, हे खोदकाम करत असतांना वाहतुकीचे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. या खोद कामामुळे मागील काही दिवसात महामार्गाची दुरावस्था होवून अनेक प्रवाशांचे छोटे मोठे जीव घेणे अपघात झालेले आहेत.या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यु झालेला आहे ,तर काही प्रवाशांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेले आहे.खोद काम पूर्ण झाल्या नंतर महामार्गावरील माती देखील काढली जात नाही.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महामार्गावर चिखल होवून दुचाकी स्वारांचे अपघात होत असतात.शासनाने दिलेले काम करत असतांना वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता संबधित ठेकेदार काम करत आहे. सीएनजी पायीपलाईन काम घेणाऱ्या ठेकेदाराने माणस मारायची सुपारी घेतली आहे काय ? असा संतप्त सवाल श्री.लांबे यांनी केला आहे.

प्रशांत लोखंडे म्हणाले की दि.४ ऑगष्ट २०२४ रोजी सीएनजी पायीपलाईन साठी खोदलेल्या खड्यात कामगार काम करत असतांना दोन कामगार बचावले असून या घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मौजे गळनिंब ता.श्रीरामपूर येथील प्रदीप इद्रभान भोसले(वय २७) हा जागीच ठार झालेला आहे. सबंधित ठेकेदार कंपनीच्या संचालकांनी कामगारांच्या जीविताचा विचार न करता निष्काळजी पणे काम करत असल्यामुळे प्रदीप इंद्रभान भोसले या कामगाराचा मृत्यु झालेला आहे.अशाच प्रकारे याच कामा दरम्यान यापूर्वी देखील अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यबादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे लोखंडे म्हणाले.

सबंधित सीएनजी पायीपलाईन काम घेणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या संचालकांवर नगर-कोपरगाव रस्त्यावरील प्रवाशांच्या अपघातास व मयत कामगार प्रदीप इंद्रभान भोसले याच्या मृत्यूस जबाबदार धरून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हाधिकारी नगर,व पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!