नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : लोकनेते कै.बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या १७ व्या पुण्यस्मरण, निमीत्त पुष्पाजंली कार्यक्रम हनुमान मंदिर जुने गाव नायगांव बाजार येथे बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.वा.घेण्यात आला.या निमित्त त्यांचे सर्व नातवंडं यांच्या हस्ते विधीवृत पूजन करून श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. आमर्जित केशव पा.चव्हाण, प्रा.रवींद्र वसंत चव्हाण, पंकज हणमंत चव्हाण,गजानन सुधाकर पा.चव्हाण,श्रीकांत श्रीनिवास चव्हाण, व सर्व नातवंडं यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. आरती नंतर सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी केशवराव बळवंतराव चव्हाण खा. वसंत बळवंतराव चव्हाण, हणमंतराव बळवंतराव चव्हाण, सुधाकर बळवंतराव चव्हाण, आनंदराव शंकरराव चव्हाण ,-श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण,धनजंय शंकरराव चव्हाण,विजय शंकरराव चव्हाण,श्रीधर व्यंकटराव चव्हाण,डॉ. विश्वास व्यंकटराव चव्हाण व सर्व चव्हाण परिवार नायगांव बाजार यांनी पुष्पांजली अर्पण केली.
या नंतर माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर.काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम,चित्रपट अभिनेते एकनाथ मोरे, विठल पावडे,बळवंत पाटील बेटमोगरेकर, शिवाजी पाटील पाचपिपळकर,प्रल्हाद पाटील इज्जतगावकर,प्रकाश पा. चिंचाळकर,
शैलेश रापतकर,शाहीर दिगु तुमवाड,शिवाजी पाटील गोळेगावकर,हणमंत पाटील,माधव आप्पा बेळगे,सुरेश पा. कल्याण,दिंगबर सावंत,मनुरकर गुरुजी, आदीची उपस्थिती होती.याकार्यक्रमा नंतर आमदार मोहन आन्ना हंबर्डे ,श्याम दरक, नायगाव पोलिस ठाण्याचे पो.नि.मारोती मुंडे साहेब, एसडीएम सचिन खिल्लारे,मरखेल पोलिस ठाण्याचे पी एस आय मगर,ज्येष्ठ पत्रकार संजीव भाऊ कुलकर्णी, उत्तम कुलकर्णी,आदीने भेट देऊन पुष्प अर्पण केले. या निमीत्त गावातील,व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील तसेच मतदार संघातील सर्व चव्हाण परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, सहकारी कार्यकर्ते, मित्रमंडळ यांनी पूष्पाजंलीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे संचलन बालाजी शिंदे यांनी तर आभार दत्ता मामा येवते यांनी केले.
Leave a reply