राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : 11 ऑगस्ट दुपारी घोरपडवाडी शिवारामध्ये वन कर्मचारी सागर वाकचौरे यांनी मेंढपाळ भगिनीच्या पालात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला भगिनी प्रसंग वाधान राखून आरोपीच्या ताब्यातून निसटली. याचा राग मनात धरून आरोपी सागर वाकचौरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला येऊन सरकारी कामात अडथळा आणण्याची खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मेंढपाळ बांधवांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बाचकर व विजय तमनर यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पीडित महिलेची फिर्याद दाखल करून घेतली. परंतु पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक न करता संध्याकाळी सरकारी कामात अडथळा आणल्याची आरोपी वाकचौरे याची खोटी फिर्याद दाखल करून घेतली. या घटनेच्या निषेधार्थ १२ तारखेला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय येथे यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामदास बाचकर, राष्ट्रवादी युवा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बाचकर, ओबीसीचे अध्यक्ष भागवत झडे, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश लांबे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर, भारत मतकर, दत्ताभाऊ बाचकर, अनिल डोलनर, घोरपडवाडीचे सरपंच मैनाबापू शेंडगे, उपसरपंच रेवन्नात हापसे कुरणवाडीचे सरपंच काशिनाथ ढवण, उपसरपंच सुनील खिलारी, नानासाहेब करमड, माजी सरपंच शिवाजी खिलारी व सर्व मेंढपाळ बांधव कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडदे आखाडा, बारागाव नांदूर परिसरातील मेंढपाळ बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी वन परिक्षक अधिकारी पाचरणे साहेब यांना निवेदन देण्यात आले. आरोपी सागर वाकचौरे यांना तात्काळ अटक करून निलंबित करा अन्यथा १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नगर – मनमाड हायवे वर कुठलीही पूर्वसूचना न देता शेळ्या, मेंढ्या, गाई -गुरे ,वासरे सह मेंढपाळ बांधव रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सर्व मेंढपाळ बांधवांच्या वतीने देण्यात आला.
वन कर्मचारी सागर वाकचौरे यांनी केला मेंढपाळ महिलेच्या पालात घुसून विनयभंग तात्काळ अटक करून निलंबित न केल्यास नगर मनमाड- हायवे वर रास्ता रोकोचा विजय तमनर यांचा ईशारा

0Share
Leave a reply