विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : नुकत्याच पार पडलेल्या पारनेर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत अटीतटीचा सामना पहायला मिळाला. प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत होते. असाच आगळावेगळा प्रयत्न पारनेरकर रहिवासी मित्र मंडळ कामोठे, नवी मुंबई यांनी अगोदरही केला होता व यावेळीही करून दाखवला आहे.पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काशिनाथ दाते यांची निवड झाली. या निवडीचे मतदारसंघात व पारनेर तालुक्यात ठीक ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील रहिवासी नवी मुंबई कामोठे येथे पारनेरकर मित्रमंडळाच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांची पेढे तुला व भव्य नागरी सत्कार रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर ३६, कामोठे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पारनेरकर रहिवासी मित्र मंडळ, मुंबई यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजप कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, माजी सभापती मधुकर उचाळे, भाजपचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भाजप नेते वसंतराव चेडे, सचिन पाटील वराळ, माजी सभापती गणेश शेळके, नगरसेवक युवराज पठारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते व प्रशांत ठाकूर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल रविवारी सायंकाळी भव्य मिरवणूकीने स्वागत करण्यात येणार असल्याचे पारनेरकर रहिवासी आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमानिमित्ताने पारनेर नगर व नवी मुंबई कामोठे येथिल महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी कुंडलीक वाफारे, मनोज कवडे, संजय आहेर, संदीप झिंझाड, साहेबराव झावरे, संतोष चौघुले, अर्जुन आहेर, बन्सी पागिरे, जालिंदर खोसे, अशोक आहेर, बाळु आहेर यांनी सांगितले.
कामोठ्यात रविवारी होणार आ. काशिनाथ दातेंची पेढे तुला !, नवी मुंबईतील पारनेरकर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन

0Share
Leave a reply