बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी व बिलोली येथे शिवसेनेचा शिंदे गटाचा वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महीलांसाठी अतिशय महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजने मध्ये ज्या महीलांचा खात्यामध्ये 3000 रुपये पडले आहे. त्यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला.
शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचा अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख संजय काळे,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख मंगेश कदम, महिला जिल्हाप्रमुख वनमाला राठोड,युवा सेना जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुपेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे,बिलोली शहर प्रमुख श्रीकांत गादगे, कुंडलवाडी शहरप्रमुख लक्ष्मण गंगोने,चंद्रशेखर भोरे,युसुफ भाई,मारोती नरवाडे,उमाकांत बादेवाड व इतर मान्यवर,महिला महिला आघाडी उपस्थित होती यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटील यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संपर्कप्रमुख संजय काळे साहेब जिल्हाप्रमुख उमेश मुंडे मंगेश कदम धुपेकर इतर मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
Leave a reply