राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करावी यासाठी तालुक्यातील अनेकांचे प्रयत्न व अपेक्षा आहेत. परंतु अनेक वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ उमेदवारांचे अर्ज मंजुर झाले आहेत.अर्ज माघारीची अखेरची तारीख १६ मे असून अर्ज भरलेले उमेदवार व त्यांचे नेतृत्व करणारे नेते यांच्या मनात निवडणूक व्हावीच व आमचाच पॅनल निवडून येईल अशी सर्वांचीच धारणा झाली आहे.परंतु या कारखान्यातील अनेक रिटायर कामगारांची ग्रॅज्युटी फंड व अनेक पगार थकीत आहेत त्याचबरोबर ऊस उत्पादक सभासदांची अनेक देणे बाकी आहे. निवडणूक लढवणारांनी याची व्यवस्था आधी करावी व ऊस उत्पादक व कामगार यांची थकीत देणी देऊन कारखाना चालू करण्याची लेखी हमी निवडणूकी पुर्वी उमेदवारांनी व प्रमुखांनी द्यावी अन्यथा निवडणुकीतून माघार घ्यावी असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेल्या या कारखान्याचे वाटोळे कुणी केले याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या तालुक्यातील सभासदांनी उत्कृष्ट कारभार करणारे कै.सर्जेराव पाटील गाडे पाटील यांचा पराभव केला तेव्हापासून एकही व्यवस्थापनाने कारखाना व सभासदांच्या हिताचे काम केले नाही.आजचे उमेदवार व नेते यांना कारखाना चालू होण्याशी काही देणे घेणे नाही.यांचा डोळा फक्त शिक्षण संस्था व इतर संलग्न संस्थेवर आहे.आज ज्यांनी पॅनल केले त्यांच्याच मागील काळात ते कारखाना चालू शकले नाही.त्यावेळची कारखान्याची परिस्थिती तर आजच्या पेक्षा खुप चांगली होती.आज कारखान्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.तरी हे लोक पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे.मि पुन्हा सांगतो यांना कारखाना चालू होण्याची काही देणे घेणे नाही.यांचा डोळा फक्त सलग्न संस्थेवर आहे.असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केला.
शेतकरी व कामगारांची थकीत देणी देऊन कारखाना सुरू करण्याची लेखी हमी द्या-सुरेशराव लांबे पाटील

0Share
Leave a reply