Disha Shakti

क्राईम

32 हजार रुपये किंमतीच्या गावठी कट्टयासह सराईत गुन्हेगारास श्रीरामपुर शहर पोलीसांकडून अटक

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनाक 16/09/2024 रोजी रात्री 22/40 वा. पोनि नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीरामपूर ते संगमनेर जाणाऱ्या रोडवरील जय भोले हॉटेच्या बाजुला पृथ्वी ढाब्यासमोर एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टीशर्ट व बरमुडा पॅन्ट घातलेला एक इसम कमरेला गावठी कट्टा लावुन बसलेला आहे. तुम्ही आता गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाली असुन तुम्ही सदर ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करुन त्याचेवर कारवाई करा. असा तोंडी आदेश दिल्याने पोलीस पथक लगेचच दोन लायक पंचांसह सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टीशर्ट व बरमुडा पॅन्ट घातलेला एक इसम बसलेला आढळून आल्याने त्याचेवर ठिक 23/10 वाजेच्या सुमारास छापा टाकुन त्यास जागीच पकडुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रामकरण विश्वकर्मा वय – 36 वर्ष, रा. स्वामी समर्थ कॉलनी सुतगिरणी रोड श्रीरामपुर, जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले, त्यास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्याचे अंगझडतीचा उद्देश सांगुन त्याला उभे करुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा खोचलेला आढळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1) 32,000/- रु. किंमतीचा एक गावठी कट्टा सिल्व्हर पांढऱ्या रंगाचा, काळया प्लॅस्टीक हॅण्ड ग्रिफवर स्टार कोरलेला असलेला मॅगझीनसह जु.वा.किं.अ.

32,000/- रु. एकूण किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपीला वरील नमुद गावठी गट्टयासह ताब्यात घेवुन त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 899/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन नमुद गुन्हयात त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि पोसई दिपक मेढे, पोना/ रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकों/ गौतम लगड, पोको रमिझराजा अनार, पोको/ संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/ आजीनाथ आंधळे, पो/कॉ राहुल पोळ, मपोको/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दोकर, पोना/ सचिन धनाड, पोना/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सही, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!