राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील कानिफनाथ चौक येथे नुकत्याच केलेल्या ड्रेनेज लाईनचे पाईपलाईन फुटली असल्याकारणाने रस्त्यावरून ड्रेनेज लाईनचे पाणी वाहत आहे गेल्या आठ दिवसापासून हे पाणी रस्त्यावर वाहत असून पावसाळ्याचे दिवस आहे आणि सध्या राहुरी शहरांमध्ये डेंगू चे थैमान असून पाणी रस्त्यावरून जात असून त्यामुळे साथीचे आजार पसरवण्यामध्ये या या पाण्याची भर पडत आहे जवळच विद्या मंदिर ची शाळा असून लहान लहान मुले या ठिकाणाहून ये -जा करतात तरीही राहुरी नगरपालिकेचे या सांडपाण्याकडे लक्ष नसून राहुरी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून राहुरी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बिनधास्त जाये करत असून याकडे दुर्लक्ष करतात बघायची भूमिका घेतात नुकतेच गणपती विसर्जन झाले असून या ठिकाणी या पाण्यातूनच गणपती विसर्जन मिरवणूक या ठिकाणाहून जाण्याचा मार्ग होता शहरातील नागरिकांचे हाल होत असून नगरपालिकेने वेळेस दक्षता घ्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे
Leave a reply