दिशाशक्ती प्रतिनिधी / भारत कवितके : बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी फाटा माळशिरस या ठिकाणी धनगर एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आणि पंढरपूर येथील १० दिवस झाले एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता ६ समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना सर्व ताकदीनिशी पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सर्व पक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळशिरस तालुका मध्ये धनगर समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.येथील धनगर समाजाचे उत्तमराव जानकर व त्यांचे समर्थक, धनगर समाजातील पुरुष, महिला,या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या वेळी ढोल ताशा वादक पथका व्दारा धनगरी ओव्या गात धनगर समाज बांधवांनी सहभाग घेतला होता.सर्व पक्षीय समाज बांधवांनी असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध केला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात धनगर समाजाला मूळातच एसटी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण दिलेले असताना काही चाणाक्ष सत्ता पिपासूनी आणि विखुरलेल्या अवस्थेतील धनगर समाजाच्या भोळे पणाचा फायदा घेऊन ” र ” च्या ठिकाणी “ड ” करुन ठेवला.त्याचे परिणाम धनगर समाजा भोगावे लागले.
एसटी आरक्षणा पासून धनगर समाज दोन तीन पिढ्या वंचित राहिला.गेल्या ७० वर्षांपासून आपल्या हक्काच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज वारंवार उपोषण, रस्ता रोको, निवेदने देणे, मोर्चे काढणे वगैरे वगैरे सारखे आंदोलन करीत आहे.पण सत्ता धारी कमिटी स्थापन करून वेळ काढू पणा करते आहे.राज्यात धनगड नाहीत फक्त धनगर आहेत.हे धनगर समाजाने कितीदा तरी पटवून दिले आहे. माळशिरस येथील रस्ता रोको आंदोलनात धनगर बांधवांनी शेळ्या मेंढ्या ही मोठ्या प्रमाणात आणलेल्या होत्या.
पंढरपूर मध्ये ९ सप्टेंबर पासून धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे, वजन कमी झाले आहे.अशाच प्रकारचे आमरण उपोषण नेवासा, पुणे व इतर ठिकाणी चालू आहे, एसटी आरक्षण अमंलबजावणी करुन प्रमाणपत्र हाती आले तरच उपोषण मागे घेतले जाईल अन्यथा नाही असा निर्धार उपोषण कर्त्यानी केला आहे. माळशिरस येथील रस्ता रोको आंदोलन वेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.एकंदरीत एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता राज्यातील धनगर समाज बांधव आक्रमक झालेला दिसून येतो आहे.
माळशिरस तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सर्व पक्षीय रस्ता रोको आंदोलन करुन केला सरकारचा जाहीर निषेध

0Share
Leave a reply