Disha Shakti

कृषी विषयी

विस्तार शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पध्दतीद्वारे कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार – कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाने विकसीत केलेल्या मॉडेलमुळे चिंचविहिरे, कणगर, कानडगांव व तांभेरे येथील शेतकर्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. विद्यापीठाचे आयडॉल म्हणुन निवड केलेल्या प्रगतशील शेतकर्यांच्या यशोगाथा अधिकाधीक शेतकर्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. या प्रकारचे कृषि विस्तार उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविले पाहिजे. कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान हे विविध विस्तार शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पध्दतीद्वारे प्रभावीपणे पोहचू शेकतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व गुजरात राज्यातील आनंद येथील विस्तार शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विस्तार शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पध्दती या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, आनंद येथील विस्तार शिक्षण संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. ए.पी. निनाम्मा उपस्थित होते.

यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की एखादे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी प्रसारमाध्यमांची गरज असते. डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की या प्रशिक्षणाच्या मदतीने शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे विस्तार कार्यकर्ते नवनविन तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचु शकतील. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. निनाम्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. तीन दिवस चालणार्या या प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील 25 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!