Disha Shakti

शिक्षण विषयी

गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कल्हापुरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत,देशभक्ती पर गीते व भाषणे सादर केली. तसेच प्रजासत्ताकदिनानिमित्त राहुरी खुर्द आरोग्य केंद्राच्या सी.एच.ओ. पूजा झिरपे मॅडम आणि परिचारिका गुंड मॅडम यांनी टीबी आजार, लक्षणे आणि उपाय या बद्दल सर्वांना माहिती दिली.श्रीमती मोरे मॅडम यांनी उपस्थित नागरीक व विद्यार्थ्यांना टीबी मुक्त अभियानाची शपथ दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषी सहाय्यक सुभाष शेटे हे होते तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा शेंडे, राजश्री पटारे,मनोज घोकशे, शिवाजी शेंडे, शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, बिलाल शेख, आशा सेविका चावरे मॅडम, गडधे मॅडम,वाणी मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती अनिता मोरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्रीमती कमळापूरकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कमळापूरकर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कांबळे मॅडम व दुधाडे मॅडम या महिला शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!