Disha Shakti

सामाजिक

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी व योग्य ठिकाणी करावा : मानसोपचार तज्ञ डॉ.संपदा अणवेकर

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : समाजामध्ये सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे आज अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामूळे सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी करणे गरजेचे आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुला – मुलींना जाळ्यामध्ये अडकल्याने अत्याचाराचे बळी ठरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी व योग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे मत सोलापूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व मानसिक समुपदेशक डॉ.संपदा अणवेकर यांनी बोलताना व्यक्त केले.

शनिवारी (दि.२१) श्री श्री गुरुकुल येथे ‘किशोवयीन मुलांची मानसिकता व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते तर यावेळी संचालिका डॉ.रूपाली कानडे, डॉ.अमरदीप कंदले, मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,मुख्याध्यापक शिवराज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ अणवेकर म्हणाल्या की,आजच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये ताण त्यांना वाढत आहेत.या ताणतणावातून मानसिक आजाराचे बळी पडत आहेत. दिवसेंदिवस मानसिक आजाराची संख्या वाढत आहे.मानसिक आजार ही मोठी समस्या नसून यातून योग्य वेळी मार्गदर्शन व समुदेशन घेतल्यास बाहेर पडने शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील नैराश्य,ताणतणाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, शिक्षकांना सांगणे गरजेचे असले आहे.हे मानसिक आजार लपवल्यामुळे अनेक मुलांचे लैंगिक शोषण होत आहे. मानसिक आजारामुळे व लैंगिक शोषणामुळे अनेक मुलं-मुली आत्महत्येकडे पाऊल उचलतात.अशा गोष्टी टाळणे गरजेचे असून अशा सर्व मानसिक नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी.योग, प्राणायाम, खेळ, संगीत, चित्रकला आदी गोष्टींची आवड लावून घेणे गरजेचे आहे.

यातून आपली मानसिक नैराश्य व ताणतणाव कमी होतो. अन्यथा मानसिक आजाराचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर व आपल्या अभ्यासावरील होतो.त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी जपणे गरजेचे असल्याचे समजले. हे विद्यार्थी दशेमध्ये होणे गरजेचे असल्याचे मत ही यावेळी बोलताना सांगितले.एवढे डॉक्टर कानडे म्हणाले की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये समुपदेशनाची गरज असते समुपदेशनामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते जीवन जगत असताना आपली विचारश्रेणी बदलते त्यामुळे सभोपदेशन गरजेचे आहे. समुपदेशनामुळे पडले दूर होऊन विचारात मध्ये सकारात्मकता येते विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात समुपदेशन घेणे व सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असल्याचे मत सांगितले.

अध्यक्षीय समारोपात डॉ.जितेंद्र कानडे म्हणाले की,प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये समुपदेशनाची गरज असते.समुपदेशनामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते.जीवन जगत असताना आपली विचारश्रेणी बदलते.त्यामुळे सभोपदेशन गरजेचे आहे. समुपदेशनामुळे नैराश्य दूर होऊन विचारात मध्ये सकारात्मकता येते.विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य ठिकाणी समुपदेशन घेणे व सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी तर आभार मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा लामतुरे, भाग्यश्री गोरे,मंजुषा जोशी, अनुजा कुलकर्णी,नगिनी बिराजदार, विशाल महाबोले, अर्जुन माशाळकर यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!