संगमनेर प्रतिनीधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील भोर विद्यालयातून शाळा सुटल्यावर घरी जाताना रस्त्यात सायकल वरून पडून १३ वर्षीय मुलीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सिद्धी सचिन भोर (रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती इयत्ता ६ वीमध्ये शिकत होती. तिच्या अकाली अपघाती मृत्यूने पठार भागावर शोककळा पसरली आहे. माळेगाव पठार गावचे माजी सरपंच बाबासाहेब भोर यांची ती नात तर शेतकरी सचिन भोर यांची ती कन्या होती.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शाळा सुटल्यावर घरी जाताना रस्त्यात सायकलवरून पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

0Share
Leave a reply