राहुरी प्रतीनिधी /आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे काल रात्री 1 ऑक्टोंबर रोजी मानवी वस्ती जवळ २० किलो वजनाचा अजगर रस्ता ओलांडताना पत्रकार आर आर जाधव यांच्या नजरेत आला आसता त्यांनी सर्फमित्र राहुल गायकवाड यांना फोन करून बोलावले असता राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी समिर शेख हे तातडीने येऊन सदर अजगराला जीवनदान देऊन पकडून त्या अजगरास जंगलात सोडून मुक्त केले.
सर्पमित्र राहुल गायकवाड यांनी सदर अजगरा बद्दल माहीती देताना सांगीतले कि सदर सरीसर्प हे अत्यंत शांत स्वभावाचे व जगातील सर्वात मोठ्या सापांच्या जातीत वावरणाऱ्या सर्वात मोठे बिन विषारी सर्प असुन हे सर्प निर्जन व शांत तसेच पाणथळ व थंड जागेत तसेच खडकाळ डोंगराळ भाग तसेच झाडावर वास्तव्यास असतात Rock Python या शास्त्रीय नावाने याची जगात ओळख आहे सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो मध्य व दक्षीण अमेरिका अमेझॉन जंगले या ठिकाणी पिलांना जन्म देणारे अजगर हे ॲनाकोंडा म्हणुन ओळखले जातात हे साप शक्यतो मानवि वस्तीत फिरकत नाहीत परंतु हल्ली मनवाने जंगलात मोठा हस्तक्षेप करून जंगले नष्ट केल्याने तसेच डोंगर फोडून जमीनी तयार करून मानवी वस्त्या निर्माण झाल्याने
ह्या सरपटणाऱ्या प्रांण्यांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात नष्ट होत चालल्या असल्याने हे प्राणी मानवी वस्तीचा आसरा घेताना सर्रास दिसुन येतात हे साप बिन विषारी असल्याने असे सर्प अढळून आल्यास घाबरूण जाऊ नये त्यांना मारून त्यांचा जिव घेऊ नये हे प्राणी निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करतात म्हणुन त्यांन न मारता सर्पमित्रांना पाचारण करून या प्राण्यांना जिवदान देण्यास मदत करावी असे आवाहान या वेळी सर्पमित्र राहुल गायकवाड यांनी नागरिकांना केले.
वरवंडी येथे मानवी वस्तीत आढळला २० किलो वजनाचा अजगर, सर्पंमित्र राहुल गायकवाड यांनी दिले अजगरास जीवनदान

0Share
Leave a reply