तेर प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील कृषी सेवा संघटनेच्या नुतन तालुकाध्यक्षपदी तेर येथील आकाश नाईकवाडी तर केशेगाव येथील गणेश जाधव यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड मंगळवार दि.5 रोजी धाराशिव येथील कृषी सेवा संघटनेच्या बैठकीत हि निवड सर्वानुमते करण्यात आली आहे प्रारंभी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज,कुबेर लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी संशोधक स्वामीनाथन यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला .
धाराशिव कृषी सेवा संघटना यांच्या वतीने धाराशिव येथे तालुक्यातील सर्वच कृषी दुकानदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नुतन संघटना मजबूत करणे,कृषी सेवा केंद्र चालकांच्या विषयक नवनवीन आडचणी संदर्भात तसेच रासायनिक खते लिंकींग मटेरियल,ऑनलाईन लाईन्स आदि विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर धाराशिव तालुका कृषी सेवा संघटनेच्या कार्यकारणीची निवड यामध्ये तेर येथील आकाश नाईकवाडी यांची अध्यक्षपदी तर चिखली येथील गणेश जाधव उपाध्यक्षपदी तसेच सचिवपदी धाराशिव येथील ज्ञानेश्वर सुर्यवंशी,कार्याध्यक्ष देवळाली येथील मेहराज शेख,कोषाध्यक्ष लासोना येथील राहुल कदम तर सल्लागार जागजी येथील शरद हावुळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नुतन कार्यकारिणीचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी सेवा संस्था धाराशिव संस्थापक अध्यक्ष नवनाथ जाधवर, विलास राठोड,संग्राम जगताप, दत्ता घुले, दिपक शेंडगे , सुरेश कदम,दादा देशमुख, मनोज सावंत , हरिचंद्र डोके, नवनाथ भुसारे,दिपक इंगळे, संतोष गाढवे, मनोज गुरव, मारुती चौरे, युवराज पवार, विकास वाघ यांच्यासह तालुक्यातील कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
धाराशिव कृषी सेवा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आकाश नाईकवाडी तर उपाध्यक्षपदी जाधव यांची निवड

0Share
Leave a reply