राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : एस.टी महामंडळाची कोपरगाव येथील डेपोची बस नगर येथे जात असताना राहुरी येथील बसस्थानकात थांबून निघाली असता राहुरीतून नगरकडे जाणाऱ्या प्रवासी महिला वैशाली राजाराम बिडवे (रा.सोनगाव) या राहुरी बसस्थानकामधून नगरला प्रवास करण्यासाठी बसल्या असता बसमध्ये प्रवास करणाऱ्या चार महिला चोरांनी त्यांच्या पर्स मधील 25 हजार रुपये रक्कम राहुरी ते विद्यापीठ बसस्टॉप दरम्यान लांबविली नगरचे तिकीट काढून त्या महिला चोर विद्यापीठ बसस्टॉपवर बसमधून उतरल्या व नंतर बस नगरच्या दिशेने निघाली असता वैशाली बिडवे यांच्या पर्समधील रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी चालक वाहक व प्रवाशांना सांगितले.
याच बसमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री गुंजाळ या सिव्हिल ड्रेसवर आपल्या कर्तव्यावर नगर येथे मुख्यालयी प्रवास करत होत्या त्यांनी प्रसंगावधान राखून बस चालकास तात्काळ बस परत राहुरीच्या दिशेने घेण्यास सांगितले व एस.टी.बस विद्यापीठ बस स्टॉपवर थांबवून चार चोरट्या महिला श्रीमती गुंजाळ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या महिलांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्या महिला चोर टोळीने चोरलेली 25 हजार रुपये रक्कम तात्काळ परत केली. तेथील उपस्थित पत्रकारांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता काही वेळातच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे महिला पोलीस पथकासह येऊन त्यांनी सदरील चोरी करणाऱ्या महिलांना व फिर्यादी महिलेस राहुरी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री गुंजाळ यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवत बस वळवून आणून चोर महिलांना वेळीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरी केलेली रक्कम परत घेऊन ही परत मूळ मालक वैशाली बिडवे यांना परत केल्यामुळे श्रीमती गुंजाळ यांचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
धावत्या बसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सतर्कने जेरबंद, चोरी झालेली 25 हजाराची रक्कम पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री गुंजाळ यांच्यामुळे महिलेस मिळाली परत

0Share
Leave a reply