विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर / वसंत रांधवण : सुपा एमआयडीसी भागातील म्हसणे फाटा फेज २ एमआयडीसीमध्ये रात्रीच्या वेळेस बेसुमार अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची तक्रार म्हसणे फाटा येथील स्थानिक शेतकऱ्यांनी मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून महिंद्रा कंपनी शेजारील jocobs solutions India Pvt Ltd ,fair company आणि ukb Pvt Ltd यासह इतर कंपन्यांमध्ये चालू असलेली कामे रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून तेथील काळी माती बाहेर इतर शेतकऱ्यांना विकली जाते व शासनाच्या नियमानुसार राॅयल्टी रकमेची दिशाभूल करण्यासाठी या ठेकेदारांकडून शासन दरबारी थोड्या प्रमाणात कमी ब्रास मुरुम व मातीची राॅयल्टी जमा दाखविली जाते व त्या राॅयल्टीच्या आधारे शासनाची फसवणूक करून एमआयडीसी हद्दीमधिल असलेले डोंगर व इतर ठिकाणी मोकळ्या जागेतील काळी माती उत्खनन करून बाहेर शेतकऱ्यांना विकली जाते व मुरुम उत्खनन करून तेथील कंपनीच्या कामासाठी वापरतात.
अशाप्रकारच्या चालू असलेल्या कामांच्या तक्रारी म्हसणे फाटा येथील परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांच्याकडे वारंवार केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत मनसेचे रविश रासकर यांनी या सदर कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी मंगळवार दि.८ ऑक्टोबर रोजी महसूल विभाग, पारनेर तहसील कार्यालय, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.
रात्रीस खेळ चाले
सुपा एमआयडीसीमध्ये रात्रीच्या वेळी कंपनी,ठेकेदारांकडू या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी एक विशेष पथक नेमून त्या पथकाद्वारे सदर कंपन्यांची समक्ष पहाणी करून योग्य ते पंचनामे करून कंपन्यांवर कारवाई करून योग्य दंड आकारण्यात यावा व शासनाच्या नियमानुसार राॅयल्टी न भरणाऱ्या कंपन्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या आशयाचे निवेदन रविश रासकर यांनी महसूल मंत्र्यांसह जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांना दिले आहे.
सुपा एमआयडीसीमध्ये अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी ,’मनसेचे रविश रासकर यांचे महसूल अधिकाऱ्यांना निवेदन

0Share
Leave a reply