इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदर मा.श्री.सचिनभाऊ अहिर साहेब, उपनेते, प्रवक्ते, जिल्हा संपर्क प्रमुख, यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात दिनांक.१७/१०/२०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता, साई सागर हॉटेल (कुरुळी) पुणे- नाशिक हाइवे ता. खेड, जिल्हा- पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा प्रमुख पदाधिकारी बैठक आयोजित केली होती.
यावेळेस अँड राहुल बंडगर पाटील युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक यांनी इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली व तसे लेखी पत्र देखील दिले. इंदापूर तालुक्यामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चांगली ताकद आहे व या आदी शिवसेना चिन्हावर उमेदवाराने 70 हजार मतदान घेतले आहे. सध्या इंदापूर मध्ये शिवसेनेस वातावरण अनुकूल आहे. यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार दिल्यास प्रचंड मताने विजयी होईल अशी पत्राद्वारे मागणी केली आहे.
इंदापूर विधानसभेची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षास मिळावी : अँड.राहुल बंडगर

0Share
Leave a reply