Disha Shakti

Uncategorized

आमदार लहू कानडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या शिवाजी रोडवरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अरुण पाटील नाईक व डॉ. सुरेश ग्यानचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवाजी चौकातील निर्मल कॉम्प्लेक्स येथे आ. कानडे यांच्या प्रचार कार्यालयाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, शहराध्यक्ष माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगावचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगावचे सरपंच सागर मुठे, अँड. मधुकर भोसले, अँड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!