Disha Shakti

क्राईम

श्रीरामपूरात उच्चभ्रू वस्तीत देह व्यापार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. दोन पिडीत महिलांची केली सुटका, श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : दिनांक 27/12/2024 रोजी महिला नामे वृंदा शिरीष ठाकुर, वय 55 वर्षे, रा. पंजाबी कॉलनी, दशमेश नगर, वार्ड नं.01, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर हि तिच्या राहते घरामध्ये अनाधिकृत बाहेरुन मुली आणुन अवैध वेश्या व्यवसाय चालतवत असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.

सदर तक्रार अर्जाबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे साो. यांना माहिती दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याची परवानी दिल्याने आम्ही पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी एक डमी ग्रहाकास पाठवुन सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याची खात्री होताच सदर ठिकाणी पोलीस पथक व पंचासह छापा टाकला असता तेथे वेश्या व्यवसाय चालवणारी महिला वृंदा शिरीष ठाकुर व तिच्या सोबत दोन ग्राहक हे प्रतिक्षेत (वेटिग मध्ये) बसलेले मिळुन आले व तिच्या घरामध्ये असलेल्या दोन वेगवेगळया बेड रुममध्ये एक महिला हि पुरुष ग्राहकासोबत व दुसरी महिला ही पोलीसांनी पाठवलेल्या डमी ग्राहकासोबत मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदर घराची मालकीण महिला नामे वृंदा शिरीष ठाकुर हिने आम्हाला मसाज करण्याकरीता ग्राहक असल्याचे सांगुन त्याचे घरी बोलावुन घेतले व आम्ही त्यांच्या घरी आल्यावर आम्हाला सांगितले की, येथे काही इसम हे समागमाकरीता येतात ते चांगले पैसे देतात. त्या कामातुन मिळालेल्या पैश्यांतुन अर्धे पैसे तुम्हाला देईन असे लालच दाखवुन आम्हाला विश्वासात घेवुन तिचेकडे असलेल्या ग्राहकासोबत बोलणी करुन ग्राहकाकडुन पैसे घेवुन रुममध्ये समागमाकरीता पाठविले. अशी माहिती दिल्याने सदर दोन्ही पिडीत महिलांची सुटका केली व घराची मालकीण वृंदा शिरीष ठाकुर, वय 55 वर्षे, रा. पंजाबी कॉलनी, दशमेश नगर, वार्ड नं.01, श्रीरामपूर हिचे विरुध्द श्रीरामूपर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 1198/2024 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम -1956 चे कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कारवाई करीत आहोत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोहेकॉ/ मच्छिंद्र शेलार, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/ अमोल गायकवाड, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/सचिन दुकळे, मपोना/ सोनाली गलांडे, मपोकॉ/अर्चना बडे, मपोकों / पुनम मुनतोडे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!