Disha Shakti

Uncategorized

विश्वासात न घेतल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव-सुरेशराव लांबे पाटील

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस: राहुरी – नुकत्याच पार पडलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित विकास मंडळाकडून मित्र पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे विकास महामंडळास पराभवाला समोरे जावे लागले असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की, या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विकास मंडळाचे बहुमत होण्याची परिस्थिती असताना मित्र पक्षाला विश्वासात न घेता योग्य उमेदवारांची निवड झाली नसल्याचे ते म्हणाले. आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन शेतमालाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला या निवडणुकीत भाजप प्रणित विकास महामंडळात सहभागी होण्याची इच्छा असतानाही मंडळाच्या अनेक नेत्यांशी चर्चा करून ही त्यांनी मित्र पक्षाला किंमत दिली नाही. त्यामुळे मला स्वतंत्र उमेदवारी करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे मतांची विभागणी झाल्याने अनेक उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव झाला.

मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या मित्र पक्षांना विश्वासात घेत उमेदवारी दिल्याने त्यांनी अल्प मतांनी विजय मिळवला. त्याप्रमाणे भाजप प्रणित विकास मंडळानेही या पुढील निवडणुकांमध्ये चुकांची पुनरावृत्ती न करता मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवाव्यात अन्यथा पुन्हा पराभवास समोरे जावे लागेल, असा सल्ला सुरेशराव लांबे पाटील यांनी मित्र पक्षाला दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!