Disha Shakti

राजकीय

डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अरुण तनपुरे यांचा अजित पवार गटात प्रवेश; तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ

Spread the love

दिशाशक्ती राहुरी  – डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी मंगळवारी (२४ जून) रात्री ८.३० वाजता देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत कारखान्याचे संचालक व पुत्र हर्ष तनपुरे देखील पक्षात सामील झाले. काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना यामुळे आज अखेर विराम मिळाला आहे.

या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी नेते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अशोक सावंत व शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या मध्यस्थीमुळे हा पक्षप्रवेश यशस्वी झाला.

या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले, “अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होणार असून, तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट होईल.” तर शहराध्यक्ष सुनील भट्टड म्हणाले, “तनपुरे कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अजित दादा  अरुण तनपुरेंना नक्कीच सहकार्य करतील.”

दरम्यान, अरुण तनपुरे यांना पाठिंबा देणारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन होणार आहे. अरुण तनपुरे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असल्याने आता प्राजक्त तनपुरे यांच्या पुढील भूमिकेकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!