Disha Shakti

क्राईम

घारगाव पोलिसांनी आंबीफाटा येथे आलिशान चारचाकीत पकडले गोमांस ; एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

दिशाशक्ती विशेष प्रतिनीधी /  इनायतअत्तार : तालुक्यातील घारगाव पोलिसांनी गोमास वाहतूक करणारी अलिशान कार मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाली आंबीफाटा येथे पकडली. एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एमएच १४ बी.सी. ५०२२ ही अलिशान बारचाकी गाडी गाव पोलिसांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीफाटा येथे पकडली.

यावेळी कारची पाहणी केली असता गाडीच्या पाठिमागील शिटखाली १ लाख ३० हजार रुपयांचे २५० किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी चारचाकी गाडीसह एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी जावेद इसाक शेख (वय-२६), रा. संगमनेर खुर्द, मोहमद उमर बुपारी (वय २३), रा. अकोले नाका, ता. संगमनेर आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, २७९,३ (५) सह प्राणी संरक्षम कायदा २०१५ चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!