दिशाशक्ती सटाणा : सटाणा येथील मविप्र संस्था संचलित जनता विद्यालय मुळाणे येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री आर.डी पगारे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेत श्री.आर.डी.पगारे यांनी भारतीय राज्यघटना हाच खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मुक्तीचा जाहीरनामा असून राज्यघटने बद्दल नागरिकात जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे पूजन बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच मविप्र संस्थेचे जेष्ठ सभासद मा.रामचंद्र बापू पाटिल यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वर्षाचा आदर्श विद्यार्थी म्हणून कु.वैशाली पवार हिची निवड करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, संस्थेचे सभासद तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक आबा अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी केले..सदर कार्यक्रमास विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक यतिन शेवाळे, गोकूळ वाघ, दिपाली सावकार, उषा जगताप , हर्षिता ठाकरे, ललीता बच्छाव, मेघा भामरे, भारती कदम, सागर देवरे, संदिप रौंदळ उपस्थित होते.
Leave a reply