तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : आगामी मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमेदिवशी तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडण्यात येणार आहे. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला अाहे. मंदिर संस्थानने या निर्णयाचे पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी स्वागत केले आहे. शनिवार, रविवार या शासकीय सुट्यांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
याशिवाय मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमेला भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर रात्री उघडले जाईल. सुलग सुट्या तसेच शनिवार, रविवारला जोडून आलेल्या सुट्यात चाकरमानी तुळजापुरात गर्दी करतात. मात्र इतर दिवशी मंदिर पहाटे साडे 4 वाजता उघडते. त्यामुळे गैरसोय होते. म्हणून सलग सुट्यातही मंदिर 1 वाजता उघडण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
भाविकांची वाढती गर्दी पाहता आगामी मंगळवार, शुक्रवार, रविवारी तुळजाई मंदिर रात्री उघडणार

0Share
Leave a reply