Disha Shakti

क्राईम

राहुरी येथील बाजारपेठेतून कपड्याचे गाठोडे चोरणारा आरोपी जेरबंद ; पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू हस्तगत

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  दिनांक 24/12/2024 रोजी कपड्याचे व्यापारी सुधीर नागपाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1300/2024 बीएनएस कलम- 309(4) 112(2) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध जबरी चोरी चा गुन्हा दाखल झाला होता.

दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन संशयित आरोपी राजू रवी आरकेरी वय 28 रा. अंबरनाथ जिल्हा ठाणे याला त्याचे राहते घरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला दिनांक 19/12/2024 रोजी अटक केली असून, पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू व वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. त्याचा दुसरा साथीदार नामे संतोष विनायक गायकवाड रा.अंबरनाथ हा फरार असून राहुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख सचिन ताजने, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!