राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रस्तुत घटना अशी की दिनांक 15/02/2025 रोजी दुपारी 14/30 वा चे सुमा पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, कोळेवाडी गावचे शिवारात हॉटेल राजनंदिनी चे समोरील खुल्या पात्राच्या शेडमध्ये इसमनामे श्रीधर लक्ष्मण कोरडे हा विनापरवाना बेकायदा चोरून दारूची विक्री करत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांचे आदेशान्वये पोलीस नाईक रामनाथ सानप व पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दुधाडे यांनी सदर ठिकाणी जाऊन नमूद बातमीची खात्री केली असता कोळेवाडी गावचे शिवारातील हॉटेल राजनंदिनी चे समोरील खुल्या पात्राच्या शेडमध्ये इसम नामे श्रीधर लक्ष्मण कोरडे हा विनापरवाना बेकायदा चोरून देशी-विदेशी दारूची विक्री करताना मिळून आल्याने राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (e)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 3995, ₹ किमतीची देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक , मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे सुचणे प्रमाणे पोलीस नाईक रामनाथ सानप ,पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दुधाडे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
Leave a reply