Disha Shakti

सामाजिक

नाऊर येथील चिमुकल्या तहुरा अत्तार हिने केला पहिला रोजा पूर्ण

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी /  जितू शिंदे : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावातील येथील रहिवासी तहुरा इनायत अत्तार (वय 7) या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. लहान वयातच उपवासाची कठोर शिस्त पाळत त्याने आपल्या जिद्दीचे आणि श्रद्धेचे दर्शन घडवले. तहुरा अत्तार पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक केले. आजोबा नुरमोहमद अत्तार, वडील इनायत अत्तार, मोठी वडील आसिफ अत्तार, भाऊ अर्शद अत्तार, मामा सय्यद असद ,अबरार अत्तार, उमेर अत्तार, आदींनी तिला शुभेच्छा देत तिच्या जिद्दीची प्रशंसा केली. इतक्या लहान वयातच रोजा पाळण्याची जिद्द दाखवणाऱ्या तहुरा अत्तार तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!