विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील पळसपूर परिसरातील प्रसिद्ध असलेल्या श्री भगवती देवी मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या व श्री भगवती देवी क्रिकेट क्लब यांच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पळसपूर प्रिमियर लिग २०२५ , भगवतीदेवी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आज गुरुवार दि.१० एप्रिल ते १२ एप्रिल सकाळी १० वाजता नविन ग्राउंड येथे केले आहे, अशी माहिती श्री भगवती देवी क्रिकेट क्लब व पळसपूर ग्रामस्थांनी दिली. या कार्यक्रमास आमदार काशिनाथ दाते,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे,व माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे,तसे पाहिले तर पळसपूर हे गाव पहिल्यापासूनच क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखले जाते. पळसपूर या ग्रामीण भागातील गावामध्ये पूर्वीपासूनच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास जालिंदरशेठ कारभारी आहेर (लेबर कॉन्टॅक्टर), युवा उद्योजक संजयशेठ कुंडलिक आहेर, संजयशेठ धनवान आहेर (उद्योजक मुंबई) यांच्या वतीने २१ हजार रुपये,उपविजेत्या संघास द्वितीय पारितोषिक भाऊसाहेब नानासाहेब रेपाळे (संचालक (हॉटेल साईकृपा ढाबा ) यांच्या वतीने १५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक कै. भाऊसाहेब धोंडीभाऊ आहेर (माजी चेअरमन) यांच्या स्मरणार्थ जालिंदर भाऊसाहेब आहेर व गणेश भाऊसाहेब आहेर यांच्या वतीने १० हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट फलंदाज,मॅन ऑफ द मॅच,चौकार हॅटट्रिक, षटकार हॅटट्रिक,विकेट हॅटट्रिक ,गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक, मालिकावीर, अंतिम सामनावीर, पंच, समालोचक, स्मृतिचिन्ह, आदी रोख रक्कम आणि ट्रॉफी अशी बक्षीसांची लयलूट असणार आहे. समालोचक म्हणून मयुर शिंदे, गोकुळ आहेर, तुषार शिंदे व प्रविण आहेर हे असणार आहेत.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. १२ एप्रिल रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पळसपूर येथे करण्यात येणार आहे.या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक श्री भगवती देवी क्रिकेट क्लब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजक श्री भगवती देवी क्रिकेट क्लब पळसपूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पळसपूर येथे आजपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, श्री भगवती देवी यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा

0Share
Leave a reply