राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : कायद्याच्या राज्यात कोणीही असुरक्षित नाही. त्यामुळे घाबरु नका. कुठे काही घडल्यास तात्काळ पोलिसांशी कींवा मला वैयक्तिक संपर्क साधा असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले.राहुरी तालुक्यातील आदर्श विद्यालय ब्राह्मणी व उंबरे या दोन्ही शाळेत जावून राहुरी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उंबरे गावात लव जिहादच्या प्रकरणावरून मुलींच्या सुरक्षततेचा प्रश्न उपस्थित करत पालकांनी मुलींना शाळेत पाठवणे बंद केले होते.
शाळेत येताना व जाताना अडचणी व असुरक्षित वाटत असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. तसेच पोलीसांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक प्रत्येक वर्गात लावला जाईल प्रत्येक शाळेत तक्रार निवारण पेटी ठेवण्यात येईल. आदिबाबत सूचना व सल्ला दिला.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, शालेय जीवनात मोबाईल वापर टाळा, अतिमोबाईल वापराचे दुष्परिणाम त्यांनी सांगितले.
याशिवाय विद्यार्थांना करियर घडविण्याबाबत पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब जाधव, ज्येष्ठ शिक्षक उत्तमराव खुळे, पर्यवेक्षक गोरक्षनाथ उगले यांनी पोलीस प्रशासनाचे स्वागत करून आभार मानले. तर, सूत्रसंचालन सुरेश जगदाळे यांनी केले.
HomeUncategorizedपोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी उंबरे व ब्राह्मणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद
पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी उंबरे व ब्राह्मणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद

0Share
Leave a reply