अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त येथील अस्थिविहारास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कार्यकर्त्याशी संवाद साधताना आमदार पाटील म्हणाले की, निव्वळ पोकळ घोषणा देण्याचे काम आपण करीत नसून या अस्थी विहारांचे पवित्र राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अधिकाधिक जागा उपलब्ध करून द्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात पर्यटन स्थळाचे, भावी युवा पिढीला प्रेरणा, ऊर्जा स्थान व्हावे यासाठी विविध अंगाने विचार करून आठ दिवसात प्रस्ताव द्या पंधरा दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी विक्रम काळे, नेताजी पाटील, आशिष सोनटक्के, विलास राठोड, मा. पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, ग्रामपंचायत सदस डॉ. विवेक बिराजदार, गणेश सूर्यवंशी, गणेश देवशिंगकर, संतराम कांबळे, मारुती बागडे, शाहूराज कांबळे, संगीता कांबळे, रंजना बनसोडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेबांच्या अस्थिविहारास, आ.राणादादा पाटील यांचे अभिवादन, भावी पिढीला ऊर्जास्तोत्र निर्माण करण्याची ग्वाही

0Share
Leave a reply