अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : श्रीराम प्रतिष्ठान,अणदूर च्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. अणदूर ते नळदुर्ग रामतीर्थ या ठिकाणी पायी दिंडी, महाप्रसाद करण्यात आला होता.या उत्सवाच्या वातावरणामध्ये राममूर्तीची प्रतिस्थापना आण्णा चौक अणदूर या ठिकाणी करण्यात आली.
श्रीराम नवमी निमित्त विविध स्पर्धेचा आयोजन याही वर्षी करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या. चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक, रुद्र लक्ष्मण बनसोडे, द्वितीय क्रमांक निहारिका नागनाथ पोतदार, तृतीय क्रमांक श्रेया सिद्धाराम अंभोर, चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक जानकी भूताळी माताटे, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे, तृतीय क्रमांक श्रुती भागवत नाईकवाडे, रांगोळी स्पर्धा पहिली ते चौथी गट प्रथम क्रमांक ईश्वरी हीरतोट, द्वितीय क्रमांक निहारिका पोतदार, तृतीय क्रमांक दिव्यश्री पोतदार, रांगोळी स्पर्धा पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांक श्रुती नाईकवाडे द्वितीय क्रमांक प्रणाली घुगे तृतीय क्रमांक ईश्वरी भांगे , रांगोळी स्पर्धा मोठा गट आठवी ते दहावी प्रथम क्रमांक प्रतीक्षा गळाकाटे ,द्वितीय क्रमांक जानकी माताटे ,तृतीय क्रमांक अनन्या आंबुरे, सामान्य ज्ञान स्पर्धा लहान गट संध्या संतोष पवार, आरुषी राहुल घोडके ईश्वरी संतोष दुधभाते ,आरव दत्ता आरदवाड, या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा मोठा गट मध्ये अनुष्का घोडके, प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे ,आदित्य अमोल घोडके ,रुद्राली सतीश सारणे या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवला वक्तृत्व स्पर्धा निकाल, लहान गट प्रथम क्रमांक ईश्वरी भांगे, द्वितीय क्रमांक प्राजक्ता घुगरे , तृतीय क्रमांक सार्थक कणसे, उत्तेजनार्थ मयुरेश्वर नाईकवाडे, वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक प्रतीक्षा गळाकाटे, द्वितीय क्रमांक श्रुती नाईकवाडे ,तृतीय क्रमांक सृष्टी कणसे ,आणि उत्तेजनार्थ अनन्या राहुल अंबूरे या सर्व स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कै.प्रभाकरराव महादेव धुमाळ गुरुजी व द्वितीय पारितोषिक कै.प्रकाश घोडके गुरुजी यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहेत या सर्व स्पर्धेनंतर गावातील युवकांनी रक्तदान शिबिर ही संपन्न केले.
या रक्तदान शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले , रक्तदान केलेल्या सर्व युवकांना प्रभू श्रीराम यांची प्रतिमा देण्यात आली .हे रक्तदान शिबिर सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर व श्रीराम प्रतिष्ठान अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.हनुमान जन्मोत्सव च्या दिवशी श्रीराम नवमी चा समारोप गावातून भव्य मिरवणूक काढून झाला.या या मिरवणुकीमध्ये अणदूर मधील व परिसरातील साडेतीन हजार युवक सहभागी झाले होते.
हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, राजकुमार गाढवे, आकाश आळंगे, गणेश मुळे, चेतन कस्तुरे, केतन हागलगुंडे,शरण मुळे, सिद्धेश्वर मातोळकर, प्रज्योत पाटील, अंकुश मोकाशे, आदित्य चव्हाण, लक्ष्मण वाघे, शुभम चव्हाण, मिथुन राठोड, बंटी राठोड, सोमनाथ लंगडे, सागर लोंढे, शुभम गाढवे, सोमनाथ पोतदार, अभिलाष करपे या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. या सर्व कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक वर्ग तसेच अणदूर ग्रामस्थ यांचे सर्वांचे आभार श्रीराम प्रतिष्ठानचे राजकुमार गाढवे यांनी केले आहे.
Leave a reply