अणदुर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ , अणदुर संचलित जवाहर कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदुर येथे शैक्षणिक वर्ष 2022- 23 व 23 -24 या कालावधीत महाविद्यालयात बीए ,बीएससी बी.कॉम, एम एस सी, एम कॉम पदवी संपादित केलेल्या 300 विद्यार्थ्यांना सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या शुभहस्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रमेश दापके ,अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलू रे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अंकुश मोकाशे व त्यांचे सहकारी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची मान्यवर पाहुण्यांसोबत मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ध्वजारोहण करण्यात आले .दीप प्रज्वलित करून दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.इरेश स्वामी म्हणाले की, शिक्षण महर्षी सि.ना . आलुरे गुरुजींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली नसती तर ग्रामीण भागाती ल विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिले असते .
कर्मवीर भाऊराव पाटील ,शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रातील दुष्काळ दूर केला. पदवीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना कसे मदत होईल याचा विचार करा .शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. संपन्नता येते, संपन्नता चारित्र्यामुळे घडते .शील जपा. माता आणि मातृभूमीसाठी काय करता येईल का ? याचा विचार करा. विद्या विनयेन शोभते असे म्हटलेले आहे . पदवी घेऊन ताठ उभे राहिलात. तुमच्या अंगी विनम्रता नसेल तर काय फायदा? विनम्रता प्राप्त करा .असे आवाहन केले. डॉ. दापके म्हणाले की, उच्च शिक्षण घेऊन माणूस गरीब राहू शकत नाही. सर्व घटकांना जोडणारी मातृसंस्था म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे युवकांना सामर्थ्य देणार एक साधन आहे. या माध्यमातून भावी जीवनाचं वाटचाल आपल्याला करावं लागणार आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. ज्ञान व गुणवत्ता प्राप्त करून प्रत्येक क्षेत्रात उतरावं लागेल. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र दादा म्हणाले की, स्वतःसाठी, समाजासाठी पदवीचा उपयोग करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार व आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मानले. सुंदर असे फलक लेखन व सजावट डॉ. प्रसन्न कंदले यांनी केले. डॉ. सोमशंकर राजमाने, डॉ.उमाकांत सलगर ,डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ.राजशेखर वरशेट्टी, डॉ.विश्वास माने दिलीप चव्हाण ,नामदेव काळे गणेश सर्जे ,महादेव काकडे, अमित आलुरे, शुभांगी स्वामी, यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी सेवानिवृत्त गुरुजन पालक व डॉ. अशोक चिंचोले, प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे, माणिक काका आलुरे, जगन्नाथ काळजाते, हलदुरे गुरुजी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply