यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : महागाव तालुक्यातील पोहंडुळ गावातील मोतीवाळो मल्टीसर्विसिसेस अनेक दिवसांपासून काळा बाजार करत होता. पण त्यांच्या दुकानी माहिती घेतली असता, असे समोर आले की, समाधान चव्हाण हा असह्य लोकांना अवैध रित्या कागदपत्रे तयार करून देत असल्याने, विधवा महिला आणि अपंग व्यक्ती यांना एडिट करून दाखले देण्यात आले आहे असे, गुपित माहिती दिली.या असह्य लोकांनकडून दुपटीने रक्कम वसूल केली असे ही म्हटले. शेती आहे असा लोकांना पण मार्किंग न घेता दाखले एडिट करून दिले. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे. अशी शंका मनात निर्माण झाली आहे.
ज्यांचा कडे शेती आहे त्यांना तहसिलदार साहेबांची मार्किंग न घेता २१,००० हजार येवढे उत्पन्न देण्यात आले, व सेतू चा खोटा शिक्का ही दाखल्यवरती मारून दिला आहे. तरी याची सखोल चौकशी करण्यात यावी, आणि त्याव्यक्तिवर का कार्यवाही करण्यात यावी, पक्षाच्या नावाखाली काळा बाजार करत आहे. याकडे महसूल प्रशासनाने तत्काळ लक्ष केंद्रित करावे.