Disha Shakti

Uncategorized

राहुरीतील शिक्षकांनी आपापल्या शाळेत हजर होऊन शाळा सुरु करण्याची शालेय व्यवस्थापन समितीची प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / शेख युनुस : जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी म्हणून राज्यव्यापी संपामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सहभागी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बद झाल्या आहेत. ‌ शिक्षकांच्या या राज्यव्यापी संपामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून शालेय विद्यार्थांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य हे धोक्यात असल्याचे लक्षात घेता राहुरीतील शिक्षकांनी आपापल्या शाळेत हजर होऊन शाळा सुरु करा असे शालेय व्यवस्थापन समितीची प्रसिध्दी पत्रकाद्वारे मागणी केली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे दोन वर्ष शाळा बंद करण्यात आल्या होत्या, त्यात आता जुनी पेंशन योजना लागू करावी,यासाठी सर्व सरकारी शालेय कर्मचारी यांनी शालेय विद्यार्थांचा कुठलाच विचार न करता बेमुदत संप पुकारला असल्याने अनेक शाळा बंद झाल्या आहेत. बेमुदत संपामुळे शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसत असल्याने शाळा सुरु न झाल्यास तालुक्यातील सर्व पालक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील असी प्रतीक्रिया पालक वर्गातून होत आहे. ‌

शासनाने विविध सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी, जे ने करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तो अधिकार आहे,परंतु यामुळे शालेय विद्यार्थांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत शाळा सुरू कराव्यात अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती ने केली आहे. यावेळी उपस्थितीत विनीत धसाळ,गोविंद फुणगे, सुनिल हिवाळे,गणेश हापसे,आप्पासाहेब देठे, भाऊसाहेब कवडे,आदी पालकवर्ग उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!