राहूरी : राहुरी तालुक्यातील रामपूर येथे काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला अन्य दोघे जखमी आहेत.पठारे वस्तीजवळ निवृत्ती श्रीपती लोखंडे यांच्या शेतीत नांगरणीचे काम सुरु असताना पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतीत बाभळीचे झाड होते.
त्या ठिकाणी कोल्हार खुर्द रामपूर शिवारात झाडाखाली राहुल रावसाहेब पठारे वय (३७), राहुल सोपान नालकर (वय ३२) व भारत गोपीनाथ नालकर (वय ३३) हे बसलेले असताना वादळी पाऊस सूरु झाल्यानंतर विजांच्या कडकडाटात त्या बाभळीच्या झाडावर वीज कोसळून राहुल रावसाहेब पठारे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी श्रीकांत पाटोळे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. मयत राहुल पठारे यांच्या मागे आई वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Leave a reply