राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या १८ जागांसाठी एकूण २२९ विक्रमी उमेद्वारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १९० इच्छूकांनी आपले उमेद्वारी अर्ज माघारी घेतल्याने एकूण ३९ उमेद्वार निवडणूक रिंगणात राहील्याने महाविकास आघाडी (तनपुरे गट) व भाजप (विखे व कर्डिले गट) यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
राहुरी बाजार समितीच्या १८ जागेसाठी २८ एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होणार असून उमेद्वारी अर्ज माघारी घेण्याचा काल २० एप्रिल हा शेवटचा दिवस असल्याने इच्छूकांची भाऊगर्दी जास्त असल्याने दोन्ही गटाच्या नेत्यांना चांगलीच डोकेदुखी ठरली. बाजार समितीच्या १८ जागेत सेवा सोसायटी मतदार संघात ११ जागांमधील प्रवर्गाच्या ७ जागांसाठी १६ महिला प्रवर्गाच्या दोन जागांसाठी ४, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या १ जागेसाठी ३ व एन. टी. प्रवगाच्या १ जागेसाठी २ उमेद्वार निवडणूक रिंगणात आहे.
ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागा निवडून द्यायच्या असून त्यात खुल्या प्रवगाच्या दोन जागांसाठी ४, आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ व अनु. जाती जमाती प्रवगाच्या एका जागेसाठी २ उमेद्वार निवडणूक रिंगणात आहे. व्यापारी मतदार संघांच्या २ जागांसाठी ४ तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी २ असे एकूण ३९ उमेद्वार निवडणूक आखाड्यात उतरले आहे. १ जागा पणन मतदार संघांसाठी राखीव आहे.काल अर्ज काढण्याची शेवटची तारीख असल्याने दोन्ही गटाच्या नेत्यांची उमेद्वारी अर्ज काढण्यासाठी चांगली दमछाक झाली.
महाविकास आघाडी (तनपुरे गट)नेे सोसायटी मतदार सघांच्या खुल्या प्रवर्गातून अरूण बाबुराव तनपुरे, महेश केरू पानसरे, बाळासाहेब रखमाजी खुळे, दत्तात्रय यादव कवाणे, नारायण धोंडीराम सोनवणे, विश्वास धोंडीराम पवार, रखमाजी बन्सी जाधव.तर महिला मतदार संघात शोभा सुभाष डुक्रे, सुनीता रावसाहेब खेवरे, इतर मार्गास मतदार संघातून दत्तात्रय निवृत्ती शेळके, वि.जा.भ.ज. मतदार संघातून रामदास परसराम बाचकर तसेच ग्रामपंचायत मतदार संघाच्या खुल्या प्रवर्गातून मंगेश जालिंदर गाडे, शारदा किसन आढाव, दुर्बल घटक मतदास संघातून गोरक्षनाथ तुकाराम पवार, अनु. जा.ज. मतदार संघातून मधुकर प्रभाकर पवार, व्यापारी मतदार संघातून चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ व सुरेश बन्सीलाल बाफना, हमाल मापाडी मतदार संघातून मारूती रंगनाथ हारदे हे उमेद्वार निवडणूकीसाठी उभे केले आहे.
तसेच भाजपा (विखे व कर्डिले गट) ने सोसायटी मतदार संघातून पाटील उद्यसिंह सुभाष, कदम सत्यजित चंद्रशेखर, निमसे शामराव शंकरराव, आढाव संदिप लक्ष्मण, तांबे महेंद्र नारायण, पवार भगिरथ दगडू, कोळसे किरण वसंत तर महिला मतदार संघातून साबळे उज्वला राजेंद्र, मांगुडे उषा ज्ञानदेव, इतर मार्गास मतदार संघातून खुळे दत्तात्रय नारायण, वि.जा.भ.ज. मतदार संघातून बिडगर आशिष विठ्ठल, ग्रामपंचायत मतदार संघातून भनगडे अमोल साहेबराव व धसाळ विराज तान्हाजी, अनु. जा.ज. मतदार संघातून डोळस नंदकुमार लक्ष्मण, अर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून बानकर सुरेश पंढरीनाथ, व्यापारी मतदार संघातून वालझाडे राजेंद्र सखाहरी, मेहेत्रे दिपक अरविंद, हमाल मापाडी मतदार संघातून तमनर शहाजी दादा या उमेद्वारांनी सत्ताधार्यापुढे आव्हान उभे केले आहे.
त्याचप्रमाणे सोसायटी मतदार संघातून खुल्या प्रवर्गातून ज्ञानेश्वर हरिभाऊ पवार व राजेंद्र भाऊसाहेब पवार तसेच इतर मागास मतदार संघातून सुर्यभान दत्तात्रय लांबे हे अपक्ष उमेद्वार निवडणूक रिंगणात आहे. यातील काही उमेद्वाराचे वेळेच्या बंधनामुळे अर्ज राहिल्याचे सांगीतले जाते.