दौंड प्रतिनिधी (सुनिल डंगाणे : वाटलूज 15 ऑगस्ट,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्व.सुभाष बा कुल माध्य व उच्च माध्य वि विद्यालय वाटलुज ता. दौंड यांच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम झाला यावेळी ह.भ.प वै.विठ्ठल महाराज काकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने १०० वृक्ष लागवड केली.
झाडामध्ये काटेसावर पिंपळ ,बिट्टी, करंज , हिरडा अर्जुन काही फुले येणारी अशी झाडे लावण्यात आली . यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे, युवराज शेंडगे सरपंच दत्तात्रय काकडे उपसरपंच, अतुल शेंडगे, योगेश थोरात, अशोक कदम, दत्तात्रय कदम, वैभव कदम, शफीक शेख, पांडुरंग कदम, बोराटे ग्रामसेवक, मुख्याध्यापक भुजबळ सर, वाघमोरे,सौ मनिषा दिवेकर,व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.