राहुरी प्रतिनिधी : (दत्तू पुरी) दिनांक -१५ ऑगस्ट: राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटूंबे आखाडा येथे साजरा करण्यात आला 75 व्या स्वंतत्र दिनाचे ध्वजारोहण राहुरी खुर्द ग्रामपंचायतच्या सदस्या श्रीमती.मीना मनोहर घोकसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थांनी व विद्यार्थिनींनी 15 ऑगस्ट व अमृत महोत्सवानिमित्त भाषणे व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली तसेच उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षामधील उत्कृष्ट विद्यार्थांचा प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर साळवे हे होते तर या कार्यक्रमास उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती. मनीषा शिवाजी शेंडे, श्रीमती. मीना मनोहर घोकसे, श्रीमती.आश्विनी कुमावत, शिवाजी पवार, उमेश बाचकर, प्रहार संघटनेचे दत्तात्रय खेमनर, आदिनाथ महाराज दवणे, भाजपा राहुरी खुर्द बूथ प्रमूख शिवाजी शेंडे, शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, शिक्षक तज्ञ जालिंदर शेडगे, अंकुश दवणे, पत्रकार रमेश खेमनर, दत्तू पुरी पत्रकार, रासपचे बिलाल शेख, किशोर पवार, सुरेंद्र राठोड, सुनिल शिंदे, निलेश बीडगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका संध्या जपकर मॅडम, श्रीमती. संजीवनी राऊत मॅडम, श्रीमती.सुनीता कल्हापुरे मॅडम, श्रीमती.छाया निमसे मॅडम, श्रीमती.वैशाली गायकवाड मॅडम, श्रीमती.अनिता मोरे मॅडम,श्रीमती.राणी साळवे मॅडम,श्रीमती.अमृता वनारसे मॅडम या सर्व महीला शिक्षकांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी बहुमुल्य योगदान देऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती वैशाली गायकवाड मॅडम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थीत होते.