Disha Shakti

Uncategorized

तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राणा दादानी भरघोस निधी दिला – दिपक दादा आलूरे

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यासह अणदूर परिसरात राणा दादांनी भरघोस निधी देऊन सर्वांना न्याय देण्याचा व विकासाचा रथ कायम ठेवला असून येणाऱ्या काळात हाच विकासाचा ओघ कायम राहावा गावोगावी भरघोस निधी आणता यावा यासाठी आपला हक्काचा आमदार असणे आवश्यक असून सर्वांनी दादांच्या निवडीत योगदान द्यावा असे स्पष्ट मत दीपक दादा आलूरे यांनी व्यक्त केले. ते अणदूर येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिरात महायुतीचे उमेदवार राणा दादा पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ नेते शिवाजी घुगे गुरुजी, काशिनाथ शेटे सावकार उपस्थित होते.

पुढे बोलताना दीपक दादा आलूरे म्हणाले की, अवघ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत नभूतो निधी देऊन सर्वांगीण विकासाला चालना दिली असून राज्यातील प्रथम बसव सृष्टीचे लिंगायत समाजाचे, बंजारा समाजाचे स्वप्न पूर्ण होनार असूदादांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून आपल्या हक्काचा आमदार पुन्हा यावा यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दीपक दादा घोडके, माजी प स सदस्य साहेबराव घुगे, दयानंद मुडके, महावीर कंदले, उमाकांत करपे, लक्ष्मण बो ग रगे, बंडूशा गोवे, निशांत आलूरे, सह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!